पौड ( ता.मुळशी ) येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री मल्लिकार्जून उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती श्री मल्लिकार्जून महादेव मंदिर संस्थान पौडचे मुख्य विश्वस्त प्रमोद शेलार यांनी दिली आहे.
बुधवार ( दि. २६) रोजी सकाळी आठ वाजता अभिषेक व महापूजा पौराहित्य बाळासाहेब रायरीकर, सायंकाळी पाच वाजता देवभेट व पालखी मिरवणूक,सायंकाळी सात वाजता शिवसेना नेते आबासाहेब शेळके यांच्या हस्ते महाआरती, राञी अकरा वाजता मुख्य पुजारी मिलिंदकाका जोरी यांच्या हस्ते लघुरूद्राभिषेक, राञी बारा वाजता निशिथकाल महापूजा, राञी दिड वाजता मंदिर प्रदक्षिणा व गुरूवारी सकाळी अकरा वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी तीन वाजता श्री मल्लिकार्जून कुस्ती दंगल होणार असल्याचे मुख्य विश्वस्त प्रमोद शेलार यांनी सांगितले.
यादरम्यान महाप्रसाद माजी उपसरपंच आणि विश्वस्त मल्लिकार्जुन देवस्थान विनायक,महाशिवरात्री फराळ पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव अविनाश बलकवडे , विद्युत रोषणाई मल्लिकार्जुन देवस्थान विश्वस्त समीर सदावर्ते, फुल सजावट समर्थ उद्योग समुह मोहन दळवी,तसेच विशेष सहकार्य पौडचे सरपंच प्रशांत वाल्हेकर,माजी सरपंच अजय कडू यांच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच आशिष जोशी, विशाल राऊत, चंद्रकांत गुजर,अशिष इंगळे, शामराव वाचकवडे,समीर सदावर्ते, मंदार दोशी,विनायक मखी,बाळासाहेब ढमाले हे विश्वस्त मंडळ उपस्थित राहणार आहे.