logo
add image
add image
Blog single photo

ताम्हीणी घाटात भीषण अपघात




माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताम्हिणी घाटात लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली खाजगी बस पलटली असून खाजगी बस मधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णवाहिका तसेच रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झालेले असून मदत कार्य युध्द पातळीवर सुरू आहे. बसमधील पाच प्रवासी बसखाली सापडून दगावले असल्याची माहिती मिळत आहे. सदर वऱ्हाड हे लोहगाव  येथून महाड या ठिकाणी लग्नकार्यानिमित्ताने चालले होते.



        अपघातातील जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी पोस्को कंपनीची ऍम्ब्युलन्सही घटनास्थळी पोहोचली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताम्हिणी घाट वळणावळणाचा व उताराचा असल्याने येथे वेगात असलेल्या वाहनांच्या अपघातांची शक्यता जास्त असते. काही दिवसांपूर्वी या परिसरात शाळेच्या सहलीच्या बसचाही अशाच प्रकारे अपघात झाला होता. माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.


वेळ - सकाळी ०९.३०-०९.५०

पर्पल ट्रॅव्हल्स ची खाजगी बस क्रमांक MH14GU3405

जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात असताना ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर गाडी पलटी झाली आहे.  २७ जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी काम करत आहेत.


मयताची नावे- 
३ महिला व दोन पुरुष 
1) संगिता धनंजय जाधव 
2)गौरव अशोक दराडे
3) शिल्पा प्रदिप पवार 
4) वंदना जाधव
5) अनोळखी पुरुष अजुन नांव निश्चित नाही


add image
add image

Leave Comments

Top