मुळशी: शिवसेनाप्रमुख हिंदुह्र्दयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनेच्या वतीने विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सुतारवाडी येथील संस्कार प्रतिष्ठान, भूगाव येथील अनिकेत सेवाभावी संस्था संचालित ॐ श्री साई मतीमंद मुलांची शाळा व चिखलगाव येथील साधना व्हिलेज येथील दिव्यांग, अपंग व अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी बारामती लोकसभेचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे, पश्चिम महाराष्ट्र स्थानिक लोकाधिकार समितीचे नाना शिंदे, पुणे जिल्हा संघटीका संगीता पवळे, युवासेना अधिकारी अविनाश बलकवडे, जिल्हा विद्यार्थी सेनेचे संघटक राम गायकवाड, युवा सेना उपअधिकारी सचिन खैरे, भोर विधानसभेचे स्थानिक लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष सुरेश मारणे, तालुका प्रमुख संतोष मोहोळ, शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ, समन्वयक दिपक करंजावणे, महिला संघटिका ज्योती चांदेरे, उपसंघटिका सुमन जोरी, उपतालुकाप्रमुख अमोल मोकाशी, विभाग प्रमुख कालिदास शेडगे, प्रदीप बोंद्रे तसेच शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक ज्ञानेश्वर डफळ यांनी केले तर आभार दिपक करंजावणे यांनी मानले.
Rohit kavthiya 😘
Nice👍👏