बावधन: वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी बावधन परिसरासह शहरातील विविध चौकांत बऱ्याच वर्षांपूर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता केवळ शोभेचे झाले आहेत, त्याचा फायदा घेत भुरट्या चोर्यांसह सोनसाखळी व घरफोड्या अशा धाडसी चोर्या दिवसाही होऊ लागल्या आहेत. त्यामुळे बावधन परिसरासह शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करुन वर्दळीच्या ठिकाणी नविन कॅमेरे बसवावेत अशी मागणी बावधनचे मा. उपसरपंच व भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी उत्तम श्रीरंग कांबळे, सूर्यकांत भोसले, उमेश रणदिवे, विष्णू सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
बावधन परिसरातील विजेच्या डीपीतून तांब्याच्या तारा, लोखंडी रॉड, फ्यूज, चोरी गेल्याच्या घटना यापुर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. शहराचा झपाट्याने विस्तार वाढत आहे. लोकसंख्या व घरांची संख्या वाढत आहे. महिला व वृद्धांना टार्गेट करून सोनसाखळी चोरी करण्यापर्यंत चोरट्यांनी मजल गेली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसोबत चोर्यांना आळा घालण्यावर पोलिसांना अपयश येत आहे. पाहणी करताना सीसीटीव्ही कॅमेरे खूप दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. मुलांचे अपहरण करण्याच्या घटनाही ताजा असल्यामुळे परिसरातील सीटीटीव्ही बसवावेत असे निवेदन बावधनचे उपसरपंच मयूर कांबळे यांनी महापालिका आयुक्ताना दिले आहे.
लहान मोठ्या चोऱ्या, छेडछाड,सोनसाखळी चोरीच्या घटनावाढत असुन शहरातील मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास कॅमेरात कैद होतील व त्याच्या आधारे पोलीस प्रशासनाला चोरट्यांचा माग काढून त्यांना जेरबंद करण्यास मदत होईल व चोरी गेलेला ऐवज व इतर साहित्य नुकसान मूळ मालकांना परत मिळेल.
- मयूर चंद्रकांत कांबळे
(मा. उपसरपंच, बावधन)
(भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष, अनुसुचित जाती मोर्चा)