logo
add image
add image
Blog single photo

आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने मुळशी तालुक्यातील आशा सेविकांच्या बचत गटाला १ लाख ३२ हजार रुपयांची मदत


पिरंगुट :  करोनाच्या कालावधीत प्रशासनाबरोबर सर्व घटकांनी काम केले आहे. विशेषतः आशा सेविकांनी या कालावधीत केलेले काम हे देवदूतासारखे आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख व माजी मंत्री सचिन अहिर यांनी केले.

           घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथे आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने मुळशी तालुक्यातील आशा सेविकांच्या बचत गटाला १ लाख ३२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश सचिन अहिर यांच्या हस्ते या आशासेविकेना सुपुर्द करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

         या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपजिल्हा प्रमुख संतोष मोहोळ, युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे, मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, शिवसेना नेते आबासाहेब शेळके, म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले, सहकार सेनेचे तालुका प्रमुख माऊली डफळ, माजी उपतालुका प्रमुख वैभव पवळे, भोर विधानसभा संघटक कैलास मारणे, माजी तालुका प्रमुख रविकांत धुमाळ, समनव्यक दीपक करंजावणे, माऊली केमसे, माजी सरपंच पोपट ववले, कार्याध्यक्ष शाकिर शेख, युवासेना अधिकारी दत्ता झोरे, महिला आघाडीच्या माजी संघटिका ज्योती चांदेरे, उर्मिला शिंदे, राणी शिंदे आदी उपस्थित होते.

            प्रास्ताविकात आबासाहेब शेळके म्हणाले, 

    मुळशीत १३२ आशासेविका व गट प्रवर्तक म्हणून काम करत आहे. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये अशी एकूण १ लाख ३२ हजार रुपये मदत केली जात आहे. जेणेकरून बचत गटाच्या माध्यमातून त्यांना अधिक मदत होईल.

सूत्रसंचालन माऊली डफळ यांनी केले तर आभार शकिर शेख यांनी मानले.

add image
add image

Leave Comments

Top