भुगांव : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भुगाव - भुकूम गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाचे सुशोभीकरण व तलावाला छत्रपती श्री शिवाजी महाराज जलाशय असे नामकरण करण्यात आले.
मुळशी तालुक्यातील जे शिवभक्त दुर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करतात अशा शिवभक्तांनी सन्मान करण्यात आला त्यात प्रामुख्याने राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते काशिनाथ उभे,जलाशय संवर्धनासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल विजय माझिरे,संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य गुढी उभारून स्वराज्य दिन साजरा करण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल अनिल पवार, भुगाव येथील शिव स्मारकाची नित्य पुजा करत असलेले अनिल रसाळ,पौड येथे शिवस्मारकाची नित्य पूजा करणारे अक्षय इप्ते,मुळशी आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे,व श्री तिकोणागड दुर्ग संवर्धन, श्री कैलास गड संवर्धन, पुर्वाचल मोहिम बांधणी, प्रथम पानिपत मोहिम बांधणी,अपरिचित मुळशी संवर्धन, मुळशीतील सात्विक शिववंदना,मुळशीतील शिवकार्याची प्राथमिक बांधणी, दशकपूर्ती पानिपत मोहिम बांधणी,आग्रा मोहिम बांधणी,श्री शिव छत्रपती पालखी सोहळा,श्री शंभुछत्रपती मृत्युंजय साधना जागरण या सर्व दुर्ग संवर्धन करणारे शिवभक्त ग्रुपचे सन्मान करण्यात आला.
यावेळी भुगाव गावच्या शिवस्मारकासाठी भुकूम गावचे विद्यमान सदस्य सचिन ननावरे यांनी एक लाख रुपये तर भुगावचे मा.उपसरपंच विशाल चोंधे यांच्या कडुन पै. पदमाकर चोंधे यांच्या स्मरणार्थ ५१,००० रुपयांची देणगी देण्यात आली.यांना भुगावचे माजी सरपंच निवृत्ती चोंधे,माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, माजी सभापती बाबा कंधारे,कृ बा समिती संचालक शिवाजी आप्पा तांगडे,सरपंच निकिता सणस, उपसरपंच अर्चना सुर्वे, भुकूमचे उपसरपंच सचिन हगवणे मा.उपसरपंच सचिन आंग्रे,भुगावचे माजी उपसरपंच विशाल भिलारे,सुरेखा शेडगे,वैशाली सणस,भुगावचे सदस्य कालिदास शेडगे,वनिता तांगडे, योगेश चोंधे,अमित घारे,संकेत कांबळे,भुकूम चे सदस्य अंकुश खाटपे, सुवर्णा आंग्रे,गौरी भरतवंश,मयुरी आमले,व पोलीस पाटील, आजी - माजी तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.