logo
add image
add image
Blog single photo

दारवली विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध


पौड: दारवली विविध कार्यकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव अविनाश बलकवडे आणि मनसे पुणे क्रिडा शहरप्रमुख मंदार बलकवडे यांनी प्रयत्न केले.

     दारवली विविध कार्यकारी सोसायटीच्या एकूण १३ जागांसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून गावातील सर्व इच्छुकांशी अविनाश बलकवडे आणि मंदार बलकवडे यांनी चर्चा करून गावाचा एकोपा राहण्यासाठी बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मांडला त्याला सर्वानुमते प्रतिसाद देत फक्त १३ सभासदांचे अर्ज ठेवले. बाकीचे सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतली.

     बिनविरोध निवड झालेले संचालक पुढील प्रमाणे : लक्ष्मण बलकवडे,दिलीप सणस,बाळासाहेब बलकवडे,नामदेव बलकवडे, सुनील थरकुडे,अशोक बलकवडे,यशवंत धनवे,सुरेश बलकवडे, राजेंद्र ओव्हाळ, ज्ञानोबा चव्हाण,ज्ञानोबा धनवे,स्वाती थरकुडे, विमल शेलार.

       निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एम.एम.नरुटे यांनी कामकाज पाहिले.यावेळी सरपंच नरेश बलकवडे, विभागप्रमुख शिवाजी बलकवडे,विद्यमान उपसरपंच गणेश धनवे,तंटामुक्ती अध्यक्ष आकाश सणस,अमृता थरकुडे, सुनील ओव्हाळ,दशरथ भालेकर,धनंजय भिलारे,साईनाथ धनवे,भाऊसाहेब भिलारे,यशवंत बलकवडे,बाळू केळकर,अमर बलकवडे,शेतकरी, सभासद व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top