पौड : पौड ( ता.मुळशी ) येथील तहसिल कार्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे सुशोभिकरण तसेच मेघडंबरीची रंगरंगोटी मुळशी तहसिल कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आली असून येथील रूपडं पालाटलं आहे.
पौड तहसिलदार कार्यालयाच्या बाहेर श्री. छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. या पुतळ्या भोवती असलेली मेघडंबरी खराब झाली होती तर परिसरात झाडे व गवताचे प्रमाणही वाढले होते. पुढील काही दिवसांत शिवजयंतीचा उत्सव साजरा होत असून या परिसरात मशाल घेऊन तसेच पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने येत असतात. तरी येथील परिसर सुशोभित करावा अशी मागणी मुळशी तालुक्यातील शिवसेना-युवासेना, पौड येथील अखिल शिवजयंती महोत्सव समिती व दुर्गामाता दौड यांच्या संयुक्त विद्यमाने युवासेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, मुळशी आणि प्रशासकीय प्रमुख या नात्यानं मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली होती.
याची दखल घेत तहसिलदार अभय चव्हाण व इतर प्रशासकीय यंञणांनी शिवजयंतीच्या अगोदर हा परिसर चकाचक केलेला असून मेघडंबरीची केलेली रंगरंगोटी सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. दोन वर्ष कोरोनामुळे शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते.माञ यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने शिवजयंती धुमधडाक्यात साजरी होणार हे माञ नक्की....!