पौड : भुगांव आणि खांबोली ग्रामपंचायतीच्या झालेल्या पोटनिवडणूकीची मतमोजणी पौड येथे आज पार पडली. भुगांव ग्रामपंचायतीच्या चार जागापैकी तीन जागासाठी अटातटीची लढत झाली. यामध्ये भुगाव येथे अमित घारे, वनिता तांगडे,योगेश्री शेडगे आणि कालिदास शेडगे तर खांबोली येथे सोनाली खानेकर विजयी झाले आहेत.
भुगांव येथील ग्रामपंचायततीच्या तीन जागासाठी मागील महिन्यात मतदान झाले होते तर काल मंगळवार ( दि.१८ ) रोजी एका जागेसाठी मतदान झाले. या चारही जागाची मतमोजणी पौड येथील सेनापती बापट सभागृहात पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार मिसाळ यांनी काम पाहिले.
वाँर्ड क्र १ : अमित अंकुश घारे ४८८ विजयी, तेजस बबन चौंधे ४७६, नोटा ११
वाँर्ड क्र २ : वनिता शिवाजी तांगडे ५३१ विजयी, दिपाली ज्ञानेश्वर गावडे ४४१ नोटा
वाँर्ड क्र ३ सर्वसाधारण स्ञी : योगेश्री अनिल शेडगे ५१४ विजयी, मनिषा प्रदीप शेडगे ३१,पल्लवी कालीदास शेडगे १६, नोटा १०
वाँर्ड क्र ३ ओबीसी पुरूष : कालीदास विठ्ठल शेडगे ४९८ विजयी, प्रशांत प्रकाश शेडगे ४८६, नोटा ६
ग्रामपंचायत खांबोली : सर्वसाधारण स्ञी : सोनाली नरेश खानेकर १६३ विजयी, प्रियांका गंगाराम तावरे १५३, नोटा ७