logo
add image
add image
Blog single photo

पत्रकार दिनानिमीत्त मुळशी तालुक्यातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना आयडॉल ऑफ मुळशी हा पुरस्कार देवून होणार गौरव


पौड : मुळशी तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमीत्त मुळशी तालुक्यातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना आयडॉल ऑफ मुळशी हा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. गुरूवारी (6 जानेवारी) अकरा वाजता भूगाव येथील फॉरेस्ट ट्रेलमधील द क्लिफ रिसॉर्टमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे तालुका अध्यक्ष विनोद माझिरे यांनी दिली.

या कार्यक्रमात ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना आयडॉल ऑफ पोलिस या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर वेदांताचार्य मंदार स्वामी येनपुरे, जिल्हा बॅंकेचे संचालक सुनिल चांदेरे, उद्योजक दिलीप चोरघे, आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे, काशिगच्या युनिक पॅथचे संचालक दत्तात्रेय शेळके, नांदगावच्या बचत गटाच्या शुभांगी शिंदे याना ऑयडॉल ऑफ मुळशी या पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे. या कार्यक्रमास आमदार संग्राम थोपटे, सभापती पांडूरंग ओझरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार आदि उपस्थित राहणार आहेत. यावेळी हिमालय नागरी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन होणार आहे.

add image
add image

Leave Comments

Top