पौड : मी लोकमतातून निवडून येत नाही असा काही जण आरोप करायचे.स्वताला फार धनाड्य व लोकनेता समजणारे पडले. बँकेची निवडणूक अवघड होती.माञ तुमच्या बरोबर जनशक्ती असेल तर तुम्हाला माणसं सोडून जात नाहीत.नोकर भरती करताना पीडीसीसी बँकेत गौडबंगाल झाले.यापुढे बँकेत कामाला लावताना कोणाच्या रूपायालाही हात लावणार नाही. मुळशी तालुक्यात सहकार वाढला असता तर गुन्हेगारी वाढली नसती. यापुढे कुठल्याही शेतकऱ्यांचे काम अडविले जाणार नाही.ज्यांच्यासाठी रक्त सांडले त्यांनी माझ्या विरोधात काम केले.सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला बँकेवर संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याचे मत जिल्हा बँकेच्या निवडणूकीत नुकतेच विजयी झालेले सुनिल चांदेरे यांनी पौड येथे व्यक्त केले.
जिल्हा बँक निवडणूकीत विजयी झालेले सुनिल चांदेरे यांचा सत्कार पौड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित करण्यात आला होता.यावेळी सुनिल चांदेरे बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते राजाभाऊ हगवणे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,सभापती पांडुरंग ओझरकर,नियोजन समिती सदस्य अमित कंधारे,पीएमआरडीए सदस्य सुखदेव तापकीर, उपसभापती विजय केदारी,राधिका कोंढरे,म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले,कोमल वाशिवले, कोमल साखरे,वैशाली गोपालघरे, उज्वला पिंगळे, स्वाती हुलावळे,दिलीप आण्णा दगडे,अजित इंगवले,अंकुश मोरे,दिपाली कोकरे, दगडूकाका करंजावणे, भगवान नाकती, सुरेश हुलावळे,अंकुश वाशिवले,अंकुश उभे, चंदा केदारी, उज्वला मारणे, युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, विलास अमराळे,लहूशेठ चव्हाण, माजी सरपंच प्रशांत रानवडे,विजय येनपुरे, माजी उपसरपंच प्रविण धनवे,जितेंद्र इंगवले,भाऊ केदारी,विठ्ठल पडवळ, गोवर्धन बांदल, सतिश सुतार,सागर धुमाळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे म्हणाले की,२२ वर्ष सदस्य असताना शेतकऱ्यांचे भले करता आले नाही. मुळशी तालुक्यातील तरूणांना उद्योग व व्यवसायसाठी दिशा देण्याचे काम सुनिल चांदेरे पुढील काळात करतील. राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवून धनशक्तीला पराभूत करण्यात यश आले आहे.जिल्हा परिषद,सभापती, बँकेचे अध्यक्षपद भुषविले. अनेक जण त्यांना जाऊन मिळाले.माञ राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाले.गद्दारी करणाऱ्याचा लेखा - जोखा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पुढील दोन दिवसांत मांडणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत सर्व उमेदवार निवडून येतील .बँकेत मुळशीतील तरूणांना नोकरी देण्यास प्राधान्य यापुढे दिले जाईल. यावेळी सविता दगडे, स्वाती दगडे, अंकुश मोरे,सुहास भोते यांचीही भाषणे झाली.