पिरंगूट : पिरंगूट ( ता.मुळशी ) येथील श्री शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीही भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून तालुक्यात विविध क्षेञात आपल्या कार्याने ठसा उमटविणाय्रा मान्यवरांना यावेळी श्री शिवराय पुरस्काने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषदादा पवळे यांनी दिली आहे.
हा पुरस्कार सोहळा आँक्सफर्ड अँव्हेन्यू लवळे फाटा येथे शनिवार ( दि.२५) रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे. कृषी विभागातील राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर निवृत्ती बोडके यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार असून मुळशी तालुक्यात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे,महिला दक्षता समितीच्या लक्ष्मीताई किसन सातपुते, भानुदास बाबुराव ससार, संजय मारूती मारणे,नरेंद्र कपूरचंद कोठारी,बसवराज मल्याप्पा विन्नी,मुळशी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष विनोद शांताराम माझिरे, हाँटेल श्रीपादचे मालक ओजस दिलीप पाटील,शिंदेवाडी येथील डाँ. कु.पायल राजेंद्र शिंदे,शिवकन्या ओंकार मुळूक, कु.मोनिका राजेंद्र गोळे यांनाही विशेष श्री शिवराय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री शिवराय पुरस्काराचे हे बारावे वर्ष असून प्रतिष्ठानच्या वतीने आत्तापर्यत २१ वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. २५ तारखेला होणाऱ्या रक्तदान शिबीरामध्ये ३०० पेक्षा रक्त संकलन करण्याचा निश्चय प्रतिष्ठाच्या वतीने करण्यात आलेला असून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवळे,अक्षय सातपुते, गणेश मांडेकर, निलेश पाडाळे, मयुर मारणे, विजय मारणे,अमित गोळे,नवनाथ चरवड, सतीश सुतार,मोहन आवळे यांनी केले आहे.