पौड : मुळशी तालुक्यात काल झालेल्या सात ग्रामपंचायतीची मतमोजणी पौड येथे शांततेत पार पडली. तर भुगांव आणि खांबोलीच्या मतमोजणीचा निकाल राखून ठेवला असून पुढील महिन्याच्या १९ तारखेला येथील मतमोजणी होणार आहे. तहसिलदार अभय चव्हाण यांच्या नियंञणाखाली हि मतमोजणी पार पडली.यावेळी नायब तहसिलदार श्रीकांत मिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलिस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड उपस्थित होते. पौड येथे विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.
निवडणूक निकाल लागलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे :
कुळे जागा १ : दत्ताञय साठे - ७५, मंदा मराठे - १७८ नोटा - २
पिरंगूट जागा २ : प्रतिक्षा आवळे - ४३१, माया गोळे - २७८, नोटा - ४,
अमर निकटे - ५३१, विजय पवळे - ५४, नोटा - २
चांदे जागा १ : मयुरी मांडेकर - १२०, प्रतिक्षा मांडेकर - १२३, नोटा - १
धामणओव्हळ जागा १ : नवनाथ काळे - २९,संतोष शेडगे - ६० नोटा - ००,
ताम्हिणी जागा १ : अश्विनी कोकरे - ११३, प्रियंका मरे - ६५,नोटा - ०८
निवे जागा १ : भरत गाऊडसे - १५६, जयवंत चोरघे - ९८, नोटा - २
वाळेण जागा १ : गणेश मोढवे - ५०, संजय साठे - १०६, नोटा - १