पिरंगूट : कर्नाटक सरकारने छञपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची तसेच देशातील तमाम हिंदू जनतेची माफी मागावी.अन्यथा कानड्यांचा बीमोड करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून धडा शिकवू.गेल्या अनेक वर्षापासून कर्नाटकात मराठी माणसांवर अन्याय होत आहे. राज्यात कर्नाटकच्या गाड्या फोडण्याचे काम शिवसैनिक भविष्यात करतील.कर्नाटकच्या कानडी मुख्यमंञ्यांनी आपला हिंदू विरोधी व्देष पुन्हा दाखवून दिला असल्याची टिका शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी घोटावडे फाटा ( ता.मुळशी ) येथे केली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांची कर्नाटकात विटंबना झाली. याचा निषेध मुळशी तालुका शिवसेने तर्फे घोटावडे फाटा येथे कर्नाटकचे मुख्यमंञी यांचा फोटो जाळून करण्यात आला.
यावेळी जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे,तालुका प्रमुख सचिन खैरे,म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले,शिवसेना भोर विधानसभा समन्वयक प्रकाश भेगडे, भानुदास पानसरे, संतोष मोहोळ,रविकांत धुमाळ,शिवसेना समन्वयक कैलास मारणे,शिवसहकार सेनेचे तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ,माजी उपतालुकाप्रमुख वैभव पवळे, शिवसेना समन्वयक अमित कुडले,युवासेना संघटक दत्ता झोरे, मोहन शिंदे, नागेश साखरे, शिवसेना संघटक माऊली केमसे,शिवाजी बलकवडे, अविनाश कानगुडे,पोपट ववले, नितीन लोयरे, दत्ता काळभोर रूपेश जाधव, नाना मरगळे, भाऊ हुलावळे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे म्हणाले की, शिवाजी महाराजाचे फोटो लावून व नाव वापरून केंद्रात भाजपाने सत्ता मिळावली. माञ कर्नाटकात झालेल्या विटबंनेप्रकरणी भाजप सरकार गप्प बसले.
म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले म्हणाल्या की, छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.