पिरंगूट : आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून लवळे गावच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी मिळवुन देऊ व कुठल्याही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. असे प्रतिपादन मुळशी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी लवळे येथे केले.
भरे ते लवळे या रस्त्यावरील कळमकरवसती जवळील पुलाचे भुमिपुजन मातेरे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. आमदार संग्राम थोपटे यांच्या माधयमातून नाबार्ड मार्फत सदर पुलासाठी एक कोटी एकतीस लक्ष रु निधी मंजूर झाला आहे. भरे ते लवळे रस्त्यावरील हा पुल कमी उंचीचा असल्यामुळे पावसाळ्यात थोड्या पुरामुळे सुद्धा या पुलावरुन पाणी जायचे यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अनेकदा बंद होत असे. सदर अडचण आता दुर होणार असुन मुळशी च्या पश्चिम भागात जाण्यासाठी अंतर आता कमी होणार आहे.
या प्रसंगी सरपंच नीलेश गावडे, उपसरपंच रणजित राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दादाराम मांडेकर, शिवाजी बुचङे, संदिप केदारी सुहास भोते, कुमार शेडगे, उज्वल ववले, गुलाब लेणे, शंकर बत्ताले, मा. सरपंच संजय सातव, भाऊ केदारी ग्रामपंचायत सदस्य बाळु राऊत, शिवराम सातव, अजीत चांदिलकर, राहुल खरात, नर्मदा टकले, सारिका कळमकर, किमया गावडे, सुजाता मोरे, वर्षा राऊत, सायली सातव, साधना सातव, राणी केदारी, नव निर्वाचित संत सावता महाराज सह. सोसायटीचे संचालक बाळासाहेब कळमकर, रंगनाथ राऊत, सुरेश राऊत, बाळासाहेब सातकर, राजेंद्र कुरळे, वैशाली सातव, सागर सातव, चंद्रकात भोसले, गजानन शितोळे, उत्तम केदारी, मंगल रावडे, विठ्ठल बाणेकर, सोमनाथ कळमकर, पोपट कळमकर, दत्ता मोरे, गणेश गावडे, महेश सातव, ऋषीकेश राऊत, अमोल सातव, आनंद राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.