logo
add image
add image
Blog single photo

भुकूम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन हगवणे यांची बिनविरोध निवड


पिरंगूट : मुळशी तालुक्यातील भुकुम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन बाळासाहेब हगवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पूर्वीचे उपसरपंच सचिन पोपटराव आंग्रे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. सचिन हगवणे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भागवत यादव यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने भूकुम ग्रामपंचायतीची विकासाची घोडदौड अशीच पुढे ठेवणार असल्याचे यावेळी उपसरपंच सचिन हगवणे यांनी आवर्जून सांगितले.

        यावेळी  सरपंच रेखा योगेश वाघ ग्रामपंचायत सदस्य अंकुश प्रकाश खाटपे,निलेश जयसिंगराव ननावरे,सुवर्णा सुभाष पानसरे,गौरी प्रसाद भरतवंश,सुवर्णा रामदास आंग्रे,मयुरी अभिलाष आमले उपस्थीत होते.

add image
add image

Leave Comments

Top