पौड : शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुळशी तालुक्यातील चाले येथे ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले असून पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी माजी संघटिका स्वाती ढमाले यांनी या कीर्तनाचे आयोजन केले आहे.
रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी चाले ( ता.मुळशी ) येथील सुभद्रा लॉन्स येथे सायंकाळी ४.३० वाजता हे कीर्तन पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर हे आँनलाईन शुभेच्छा देणार असून उपनेते रविंद्र मिर्लेकर,उपनेत्या शालिनी देशपांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे,कुलदीप कोंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोडे, युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे,शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे तसेच शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.तरी या किर्तनाला उपस्थित राहताना नागरिकांनी सोशल डिस्टंस पाळून सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाती ढमाले यांनी केले आहे.