logo
add image
add image
Blog single photo

पीएमआरडीएत सरपंचाना प्रवेश, गावचा विकास सरपंचच करू शकतो : खासदार सुप्रिया सुळे


पिरंगूट : ग्रामपंचायतीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सरपंचाना आता थेट पीएमआरडीएमध्ये प्रवेश मिळालेला असून गावाचा विकास चांगल्या प्रकारे सरपंचच करू शकतो.आगामी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस झेंडा फडकला पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. काम करणाऱ्यांना नक्कीच संधी मिळेल. ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकार नाहक ञास देण्याचे काम करत असून या सरकारच्या काळात महागाइंने उच्चांक गाठला असल्याचे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घोटावडे ( ता.मुळशी ) येथे केले.

             मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक मेळावा तसेच नुकतीच पीएमआरडीए सदस्यपदी मुलखेडचे सरपंच पै.सुखदेव तापकीर यांची निवड झाली त्याबद्दल तापकीर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , राष्ट्रवादी युवकचे राज्य कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जेष्ठ नेते रामभाऊ ठोंबरे, राजाभाऊ हगवणे,सविता दगडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,सभापती पांडुरंग ओझरकर,नियोजन समिती सदस्य अमित कंधारे,माजी सभापती बाबा कंधारे, उपसभापती विजय केदारी,अंजली कांबळे,राधिका कोंढरे,कोमल वाशिवले, वैशाली गोपालघरे, स्वाती हुलावळे, शांताराम इंगवले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सणस, सचिन अमराळे, सुनिल चांदेरे,अंकुश मोरे,दिपाली कोकरे, सुनिल वाडकर, दगडूकाका करंजावणे, भगवान नाकती,सुरेश हुलावळे,युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, विलास अमराळे, माजी सरपंच प्रशांत रानवडे,जितेंद्र इंगवले,योगेश ठोंबरे, निखील मारणे,भाऊ केदारी, बाळासाहेब झोरे,नामदेव आण्णा माझिरे, सतिश सुतार, नेहा साठे,लहुशेठ चव्हाण,सागर धुमाळ, साईदास शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यावेळी म्हणाले की,पीएमआरडीए निवडणूकीसाठी चार सरपंचानी माघार घेऊन सुखदेव तापकीर यांना एकमुखी पाठिंबा दिला. या भागातील आमदारांनी सरपंचाना दहा - दहा वेळा फोन लावला व विकासकामे केलेली आहेत मतदान करा असे सांगितले. माञ विकासकामे राष्ट्रवादीनेही केलेली आहेत म्हणून अनेक सरपंचानी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले. शिवसेनेलाही तीनच मतांवर समाधान मानावे लागले.तर भाजपा उमेदवारालाही एकच मतदान झाले.  २०२२ साली होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत ९ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येणार आहेत.विधानसभेला मुळशीतून आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पण होणाऱ्या विकासकामाच्या भुमिपूजनाला आमदार विश्वासत घेत नाही. येणाऱ्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत दाखवून देऊ.

           माजी सभापती बाबा कंधारे यावेळी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य नागरिकांना संधी देणारा पक्ष आहे. चांदणी चौक ते ताम्हिणी घाट पर्यत कासारआंबोलीच्या पुढे इंडस्ट्रीयल झोन व्हावा.जेणेकरून कंपन्या येऊन रोजगार निर्मिती होऊ शकते.

        जेष्ठ नेते राजाभाऊ हगवणे म्हणाले की, १७ वर्षापूर्वी मला पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली.काही जणांनी अपक्ष उमेदवार विधानसभेला उभा केला.त्यात थोडक्या मतांनी माझा पराभव झाला. १७ वर्ष पद नसताना काम करत आहे. स्व. तुकारामबुवा हगवणे यांनी कायम नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले असून आम्ही तोच वारसा पुढं चालवत आहे.

      पीएमआरडीएचे नवनियुक्त सदस्य सुखदेव तापकीर म्हणाले की, तालुक्यात चुकीचे झोनिंग झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुलखेड गावात मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय. पीएमआरडीएसाठी उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्व नेत्यांनी एकमुखी पाठिंबा दिला.राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे व सभापती पांडुरंग ओझरकर यांनी माझ्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले. त्याला तालुक्यातील सर्व नेत्यांनी चांगली साथ दिली.पहिल्या पसंतीचे ६५ मतदान झाले.पक्षाने दिलेली जबाबदारी मी सार्थपणे पार पाडेल. 

          यावेळी युवक राज्य कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच भोर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल चांदेरे यांचीही भाषणे झाली.

add image
add image

Leave Comments

Top