पौड : माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य स्व.सुभाषभाऊ अमराळे यांच्या जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार सोहळा २०२१ (वर्ष १ले) चे आयोजन करण्यात आले असून औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील माजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून राज्यमंञी दत्तामामा भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत केला जाणार असल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन अमराळे यांनी दिली.
हा कार्यक्रम बुधवार दि.३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० मिनिटांनी सुतारवाडी (अंबडवेट) येथील दत्तमंदिर येथे होणार आहे.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,आमदार संंग्राम थोपटे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,माजी खासदार नानासाहेब नवले,अशोक मोहोळ,माजी आमदार शरद ढमाले,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र ढमाले उपस्थित राहणार आहेत.
तरी मुळशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून माजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे विचार ऐकावेत असे आवाहन बारामती लोकसभा मतदार संघ सोशल मिडीया सेलचे अध्यक्ष सतिश सुतार यांनी केले आहे.