logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुका शिवसेनेचा पिरंगूट येथे उद्या कार्यकर्ता मेळावा


पौड : मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक आढावा बैठक,शिवसेना पद नियुक्ती आणि भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी दिली आहे.

             शिवसेना पक्षप्रमुख,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंन्द्र मिर्लेकर,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर,पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर,पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हि आढावा बैठक रविवार दि. ३१ आँक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजता,सुरभी हॉल पिरंगुट येथे संपन्न होणार आहे.

         तरी सर्व शिवसैनिकांनी, सर्व अंगीकृत संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आर्वजून उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी केले आहे.

add image
add image

Leave Comments

Top