पिरंगूट : आपल्या कामाचे कौतुक केले जावे म्हणून आदर्श मिञ मंडळ स्पर्धेचे आयोजन केले जाते. कोरोना काळातही अनेक मंडळानी चांगले काम केले.मावळ आणि मुळशी तालुके एकच आहेत. निस्वार्थी मनाने काम केले तर समाज आपल्या मागे खंबीरपणे उभा राहतो याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे आबासाहेब शेळके हे आहेत.सामाजिक बांधलकी जपण्याचे काम आबासाहेब यांनी केले आहे.प्रत्येक व्यक्ती आपली आहे हे ध्येय आबांनी ठेवले आहे.राजकारण्यानी कार्यक्रमापेक्षा कामाला जास्त उपस्थित राहणे गरजेचे आहे.जनतेचे प्रश्न सोडविणे हि लोकप्रतिनिधीची महत्त्वाची कामे आहेत.असे मत मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांनी पिरंगूट येथे व्यक्त केले.
आबासाहेब शेळके मिञ मंडळ,तहसिल कार्यालय मुळशी व पौड पोलिस यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आदर्श गणेश मंडळ स्पर्धा, महिलांसाठी मेहंदी स्पर्धा तर मुलांसाठी निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ पिरंगूट येथे पार पडला. यावेळी आमदार सुनिल शेळके बोलत होते. यावेळी तहसिलदार अभय चव्हाण,पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, उद्योजक आबासाहेब शेळके, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे,म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले,युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे, युवासेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले,शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका संगिता पवळे, जिल्हा परिषदेचे गटनेते शांताराम इंगवले, शिवसेना भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे,भोर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल चांदेरे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे, नेते सुरेश हुलावळे,सरपंच चांगदेव पवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, सुनिल वाडकर,तुषार पवळे,युवा उद्योजक शुभम शेळके,अक्षय शेळके,माजी शिवसेना तालुका प्रमुख रविकांत धुमाळ,शिवसहकार सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, पिरंगूटचे उपसरपंच राहूल पवळे,भरेचे माजी सरपंच पोपटराव ववले,पिरंगूटचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पवळे, शिवसेना समन्वयक कैलास मारणे,शिवसेना समन्वयक मोहन शिंदे,माजी सरपंच रमेश पवळे, पिरंगूटचे माजी उपसरपंच रामदास पवळे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर म्हणाले की, आबासाहेब शेळके कमी बोलतात काम जास्त करतात.पोलिसांनी व पञकारांनी एका मंडळासाठी काम करणे हे महाराष्ट्रातील दुर्मिळ गोष्ट आहे.
तहसिलदार अभय चव्हाण यावेळी म्हणाले की, आबासाहेब शेळके यांनी केलेली मुळशी गणेशोत्सव स्पर्धा हा स्तुत्य आहे.मुळशी तालुक्यातील नागरिक चांगले असून गेली दोन अडीच वर्ष काम करताना कोणतीही कमतारता जाणवली नाही.
या कार्यक्रमाचे आयोजन शाकीर शेख, पञकार प्रदीप पाटील, प्रविण सातव, महेश मोहोळ, सागर शिंदे, योगेश गोसावी,राजेंद्र नाईकरे,चिंतामण शिंदे,सोमनाथ शिंदे, विनोद मारणे, शंकर जोरी, रोहन जाधव, सौरभ सांळुके,उज्वला वळसंगे,समीर दुडे, अभिजित भोसले यांनी केले होते.सूञसंचलन प्रा.संतोष गावडे यांनी केले तर आभार मंडळाचे शाकीर शेख यांनी मानले.
विजयी गणेश मंडळे पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक : बालवीर युवळ मंडळ,पिरंगूट कँम्प
व्दितीय क्रमांक: नवयुग मिञमंडळ, शिंदेवाडी
तृतीय क्रमांक : धर्मवीर संभाजी मिञ मंडळ, रिहे व शिवराज कलाक्रिडा मंडळ, कुळे
उत्तेजनार्थ १)हुतात्मा नग्या कातकरी मंडळ ,पौड २)हुतात्मा गणेश मंडळ,लवळे, ३)जाणता राजा मिञ मंडळ भरे,४) हनुमान तरूण मंडळ अबंडवेट