पौड : पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा, रिंगरोड विषयी असलेल्या समस्या तसेच मुळशी तालुक्याचे ठिकाण पौड या ठिकाणी नगरपंचायत व्हावी अशी मागणी मुळशी तालुका शिवसेना प्रमुख सचिन खैरे यांनी नगरविकास,नगर रचना व सार्वजनिक बांधकाम, विभाग एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर हे सुध्दा यावेळी उपस्थित होते.
मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण हे पौडगाव ठिकाण असून येथे तहसीलदार कार्यालय,पंचायत समिती ,पोलीस स्टेशन,ग्रामीण रूग्णालय तसेच महत्वाची विविध कार्यालये आहेत. पौडची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे स्थानिक लोकांच्या समस्यां सोडविण्यासाठी ग्रामपंचायतकडे निधी कमी पडत आहे.तरी याठिकाणी नगरपंचायतची उभारणी करावी. तसेच पीएमआरडीए प्रारूप विकास आराखडा व रिंगरोड विषयी शेतकर्यांच्या असलेल्या विविध समस्या सोडवाव्यात असे निवेदन देण्यात आले.
यावेळेस शिवसेना पुणे जिल्हा उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, तालुकाप्रमुख सचिन खैरे,समन्वयक दिलीप गुरव,संतोष लोयरे,सचिन पळसकर,नितीन लोयरे उपस्थित होते.