पिरंगूट : पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सूस येथील सुहास भोते यांची नियुक्ती करण्यात आली असून आमदार संग्राम थोपटे आणि माजी खासदार अशोक आण्णा मोहोळ यांच्या हस्ते सुहास भोते यांना नियुक्तीपञ देण्यात आले आहे.
सुहास भोते यांनी यापूर्वी तीन वर्ष मुळशी तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपद सक्षमपणे संभाळले आहे.या काळात त्यांनी दहावीत पहिले आलेल्या काही विद्यार्थ्यांना संगणक वाटप, कोरोना काळात किराणा किटचे वाटप, छञी वाटप, विद्यार्थ्यांना वही वाटप,मोफत आधारकार्ड-पँनकार्ड शिबीर, ५०० ट्रँक सूटचे वाटप तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते.
यावेळी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, संजय उभे, संतोष साखरे, शिवाजी जांभूळकर, शिवाजी बुचडे,युवा नेते मधुर दाभाडे, दादाराम मांडेकर,ज्योती जोरी, संदीप केदारी, अशोक मातेरे, संग्राम मोहोळ, प्रसाद खानेकर, शिवाजी मालपोटे, कुमार शेडगे, सुरेश पारखी,राहुल जाधव, रेखा शिंदे, कैलास चोंधे, अमित जांभूळकर, दिग्विजय हुलावळे, मोरेश्वर घारे,रोहिदास केमसे,संतोष गायकवाड, आशिष नागरे, शंकर बत्ताले, उज्वल ववले, गणेश पवळे उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यात युवकांचे संघटन बळकट करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर सुहास भोते यांनी सांगितले.