पिरंगूट : आगामी जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूकीत सर्व जागा ताकदीनिशी लढणार असून सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून निष्ठावंताला न्याय देणार आहे. आमची जाणीव झाली म्हणून गेल्या दोन दिवसांत अनेकांनी फोन करून प्रवेश करणाऱ्याना थांबवले. प्रवेश केलेल्यांना आदराची व सन्मानाची वागणूक दिली जाईल.काँग्रेस कार्यकर्त्यांला जो न्याय मिळायला पाहिजे तो मिळत नाही. मुळशी तालुका ऐकेकाळी राज्यात काँग्रेसचा बालेकिल्ला होता.विकासकामांना महत्त्व असते ते या जमलेल्या गर्दीतून दिसून येत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी शेळकेवाडी ( ता.मुळशी ) येथे केले.
मुळशी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, सहकारी संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीसाठी व कृषि उत्पन्न बाजार समिती व शासकीय कमिटीवर निवड झालेल्या पदाधिकाय्रांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शेळकेवाडी येथील जय सुचंद्रिका मंगल कार्यालय येथे करण्यात आला होता.यावेळी आमदार संग्राम थोपटे बोलत होते. यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ,मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते, संजय उभे, संतोष साखरे, शिवाजी जांभूळकर, शिवाजी बुचडे,युवा नेते मधुर दाभाडे, दादाराम मांडेकर,ज्योती जोरी, संदीप केदारी, अशोक मातेरे, संग्राम मोहोळ, प्रसाद खानेकर,शिवाजी मालपोटे, कुमार शेडगे, सुरेश पारखी,राहुल जाधव, रेखा शिंदे, कैलास चोंधे, अमित जांभूळकर, दिग्विजय हुलावळे, संतोष गायकवाड, आशिष नागरे, शंकर बत्ताले, उज्वल ववले, गणेश पवळे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोपटे पुढे म्हणाले की,पेट्रोल डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. लखीमपूरमध्ये केलेले काम चूकीचे असून विचारधारा नसणारी लोक संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. माण,मारूंजी किंवा हिंजवडी यापैकी एक नगरपरिषद लवकरच उदयास येईल. हि गावे रस्त्याच्या डाव्या बाजूला असल्याने हि गावे ग्रामीण भागात असायला हवी हा यामागील उद्देश असल्याने येथे नगरपरिषदेसाठी प्रयत्न सुरू आहेत. २००९ साली मुळशी तालुक्यात प्रथम निवडणूक लढविताना कार्यकर्ताही मिळाला नाही.यावेळी ८५०० मतदान झाले. २०१४ साली आघाडी होईल वाटले.माञ आघाडी झाली नाही.यानिवडणूकीत १४००० मतदान मुळशी तालुक्यातून झाले. तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. आघाडीचे सरकार नसताना कामात अडथळा आला.२०१९ साली केलेल्या कामाचे चांगले फळ मिळाले. या निवडणुकीत मुळशी तालुक्यातून ३५००० हजार मतदान झाले.
माजी खासदार अशोक मोहोळ म्हणाले की,देशाची परिस्थिती खराब बनली आहे. गाडी अंगावर घातली त्या घटनेची दखल घेतली जात नसून गाडी अंगावर घालणाऱ्याला वाचविले जात आहे.जो काम करतो त्याच्या मागे जनता उभी राहते. पुढील निवडणूकीत आमदार थोपटे यांना मुळशी तालुक्यातून ५० हजार मतदान होणार आहे.
यावेळी प्रास्तविक करताना मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे म्हणाले की, आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशी तालुक्याला मोठा निधी दिलेला असून तालुक्यातील सर्व रस्त्याची कामे सध्या सुरू आहेत.आघाडीच्या नावाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांना विचार घेतले जात नसून आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनेच पाळायचा का.काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या नवीन कार्यकर्त्यांना न्याय तसेच जुन्यांचा आदर केला जाईल.
या कार्यक्रमात भुगांवचे माजी उपसरपंच राहूल आबा शेडगे, भांबर्डेच्या माजी सरपंच सुरेखा दिघे,उरवडेचे उपसरपंच कालिदास मारणे, खांबोलीच्या सरपंच मनिषा पिंगळे,उपसरपंच अनिल खानेकर, गणेश कंधारे, मुनीरभाई मुलाणी तसेच मुळशी,मुठा,रिहे खोय्रातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.या कार्यक्रमाचे सूञसंचलन युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहास भोते यांनी केले तर आभार राहूल जाधव यांनी मानले.